Ad will apear here
Next
वैदिक गणित प्रावीण्य परीक्षा
सांगली : पारिजात अॅकॅडमीतर्फे प्रथमच वैदिक गणित प्रावीण्य परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्णपणे वैदिक गणितावर आधारित असलेली ही परीक्षा २५ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे.

प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी सांगली, मिरज, कुपवाड येथे वैदिक गणित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. येथील महानगरपालिका विभागातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थी या परीक्षेस बसू शकतात. इयत्ता पाचवीपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे, जेणेकरून मुलांचा अंकगणिताचा पाया पक्का होईल. परीक्षा १०० गुणांची असून, वेग व अचूकता या दोन गोष्टींवर ती आधारित आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे अॅकॅडमीच्या गावभाग शाखेत सकाळी आठ ते ११ या वेळेत नोंदवावीत, अशी माहिती आयोजकांनी दिली असून, परीक्षा फी फक्त १०० रुपये असेल. परीक्षेत प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
विजय कुलकर्णी : ९६०४५ ५५१९३
प्रताप शिंदे : ९१४६१ ८३९९९

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZQBBE
Similar Posts
विश्रामबाग आणि मिरजमध्येही आता वैदिक गणिताचे वर्ग सांगली : पारिजात अॅकॅडमीचे वैदिक गणिताचे वर्ग गांवभागासह विश्रामबाग आणि मिरज येथेही सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय सर्टिफिकेट कोर्ससुद्धा अॅकॅडमीने आखला आहे. ‘मनोरंजनातून गणिताकडे’ या संकल्पनेनुसार हसत खेळत वैदिक गणित शिकण्यासाठी या वर्गांना प्रवेश घेण्याचे आवाहन अॅकॅडमीचे विजय कुलकर्णी यांनी केले आहे
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
शिका वैदिक गणित सांगली : मोठमोठी आकडेमोड, गुणाकार, भागाकार करायला तुम्हाला जरा जास्तच वेळ लागतोय का? तुमचं वय काहीही असू दे, आता तुम्ही शिकू शकता वैदिक गणित आणि सोडवू शकता कितीही मोठं गणित अवघ्या काही सेकंदांमध्ये. ‘वैदिक गणित ही आकडेमोड करण्याची जगातील सर्वांत वेगवान पद्धत आहे. वैदिक गणित शिकायचं असेल तर शक्य तितक्या लवकर पुढील क्रमांकावर संपर्क साधा
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ बुधगाव (सांगली) : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी नऊ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नवीन प्रवेश सूचनेनुसार २०१७-१८ मध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख दि. ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. नवीन प्रवेश सूचनेनुसार जे विद्यार्थी संस्थास्तर व अगेन्स्ट कॅप जागांसाठी नोंदणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language